सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व महिला स्वावलंबन क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांना प्रशस्तिपत्र, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, महिला बचतगट व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
या उपक्रमामुळे गावातील महिलांना आत्मविश्वास व प्रेरणा मिळाली असून भविष्यातील पिढ्यांसाठी हा सोहळा आदर्श ठरला आहे.