वाखारी / भिलवाड ग्रामपंचायत

ता. देवळा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र

विकास कामे माहिती

गावातील विकास कामांचा आढावा

रस्ते विकास

१४ किमी

डांबरी रस्ते १४ कि. मी

पाणीपुरवठा

वाखारी -विहीर /टाकी भिलवाड -विहीर /टाकी , हातपंप -८

सौर ऊर्जा

32

सौर पथ दिवे 32 बसवले आहेत

स्वच्छता

१००%

शौचालय संख्या ८७२, सार्वजनिक -४ युनिट,प्रधानमंत्री आवास योजना घरकुल २४ /२५ करता एकूण मंजूर ९७

पूर्ण झालेली विकास कामे

प्रकल्पाचे नाव प्रकल्प मूल्य पूर्णत्व तारीख स्थिती निधीचा स्रोत
भिलवाड पाणीपुरवठा विहीर सौरपंप सरंक्षण जाळी बसविणे ₹ 748,000 April 2026 ✅ पूर्ण १५वा वित्त आयोग
अंगणवाडी डिजीटल कामे ₹ 200,000 February 2026 ✅ पूर्ण पेसा योजना
भिलवाड रस्ता काँक्रीट करणे ₹ 200,000 January 2026 ✅ पूर्ण पेसा योजना
अंगणवाडी वस्ती अंतर्गत दुरुस्ती ₹ 50,000 (अंदाजे) January 2026 ✅ पूर्ण पेसा योजना
बेघर वस्ती भूमिगत गटार PUC ₹ 300,000 August 2025 ✅ पूर्ण १५वा वित्त आयोग
वाखारी वस्ती अंतर्गत मुतारी युनिट बांधणे ₹ 200,000 July 2025 ✅ पूर्ण पेसा योजना
रोहिदास वस्ती पाणी टाकी ₹ 1,300,000 July 2025 ✅ पूर्ण पेसा योजना
बेघर वस्ती अंतर्गत काँक्रीट रस्ता ₹ 700,000 July 2025 ✅ पूर्ण पेसा योजना
वाखारी पाणी पुरवठा विहीर संरक्षण जाळी ₹ 300,000 May 2025 ✅ पूर्ण १५वा वित्त आयोग
उपकेंद्र पाणीपुरवठा संरक्षण जाळी ₹ 150,000 May 2025 ✅ पूर्ण १५वा वित्त आयोग

प्रस्तावित विकास कामे

आदिवासी वस्ती ते खंडेराव महाराज मंदिर काँक्रीट रस्ता बांधकाम

आदिवासी वस्ती ते खंडेराव महाराज मंदिर रस्ता काँक्रीटने सुधारला जाईल, ज्यामुळे पावसाळ्यात वाहतूक आणि सामाजिक-धार्मिक कार्यक्रम सोपे होतील.

गाव प्रवेशद्वार ते स्मशानभूमी काँक्रीट रस्ता बांधकाम

पावसाळ्यात चालणे सोपे होईल आणि अंतिम संस्कारासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांचा त्रास कमी होईल. हा रस्ता गावकऱ्यांसाठी सुरक्षित व सुलभ वाहतूक मार्ग बनेल.

खंडेराव महाराज मंदिराजवळ सभागृह बांधकाम

खंडेराव महाराज मंदिराजवळ बहुपयोगी सभागृह उभारण्याचे काम प्रस्तावित आहे, जे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरले जाईल.

भिलवाडा वस्ती – नाला पूरसंरक्षण भिंत बांधकाम

पावसाळ्यात वस्तीच्या दिशेने वाहणाऱ्या नाल्यामुळे पूराचा धोका असतो. तो टाळण्यासाठी पूरसंरक्षण भिंत बांधणे आवश्यक आहे