या यंत्रणेद्वारे:
शुद्ध, बॅक्टेरियामुक्त आणि थंड पाणी उपलब्ध होणार आहे.
रुग्ण, गर्भवती महिला, लहान मुले व आरोग्य कर्मचारी यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी सहज मिळणार आहे.
उन्हाळ्यात उष्माघात व निर्जलीकरण टाळण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमामुळे आरोग्य उपकेंद्रात येणाऱ्या नागरिकांचा अनुभव सुधारेल आणि त्यांच्यासाठी आणखी चांगल्या सुविधा निर्माण होतील. हा प्रकल्प स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन आणि आरोग्य हमी योजनेशी सुसंगत असून, ग्रामपंचायतीचा हा स्तुत्य उपक्रम आहे.