वाखारी / भिलवाड ग्रामपंचायत

ता. देवळा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र

"स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान – आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन"

वाखारी भिलवाड येथे 20 सप्टेंबर 2025 रोजी ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात BP, BSL, CBC तपासणी, आरोग्य सल्ला, आयुष्मान भारत ई-KYC व वयवंदन कार्ड नोंदणी करण्यात आली. शिबिराचे आयोजन आरोग्य वर्धिनी उपकेंद्र पिंपळगाव येथे करण्यात आले. अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका, आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

"स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान – आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन"
"स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान – आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन"
वाखारी भिलवाड येथे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले

वाखारी भिलवाड व ग्रामपंचायतीच्या संयुक्त सहकार्याने दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी, "स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान" अंतर्गत महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गरोदर माता, स्त्रिया आणि किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या आरोग्य शिबिरात ब्लड प्रेशर (BP), ब्लड शुगर (BSL), व पूर्ण रक्त तपासणी (CBC) करण्यात आली. यासोबतच महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन व सल्ला देखील देण्यात आला. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ई-KYC नोंदणी तसेच वयवंदन कार्ड नोंदणी देखील या शिबिरात करण्यात आली.

हा उपक्रम सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आरोग्य वर्धिनी उपकेंद्र, वाखारी भिलवाड येथे पार पडला. अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका यांनी शिबिरासाठी प्रभावी कामगिरी बजावली.

या शिबिरात गावातील अनेक महिलांनी सहभाग घेऊन तपासणी करून घेतली. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व अधिकारी, तसेच समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

हा उपक्रम गावातील महिलांच्या आरोग्य सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले.